सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 10 जून 2018

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांना प्राइमटाइम फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्‍चिम बंगालचे माजी राज्यपाल एम. के. नारायणन आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. आयआयटी मद्रासचे संचालक भास्कर राममूर्ती, प्राइमटाइम फाउंडेशनचे संस्थापक के. श्रीनिवासन आदी यावेळी उपस्थित होते. 

लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राइमटाइम फाउंडेशन आणि ई-मॅगॅझीन प्रिसेन्सच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात येतो. संसदेत मला जनतेचे प्रश्‍न मांडता आले. हा पुरस्कार त्यांना समर्पित करताना मला आनंद होत आहे, अशी भावना सुळे यांनी व्यक्त केली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live