नाती जपणे हे फार मोठे काम आहे, एकटं राहणाऱ्याला ते काय कळणार' : सुप्रिया सुळे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे: 'नाती जपणे हे फार मोठे काम आहे, एकटं राहणाऱ्याला ते काय कळणार' असा टोला सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. देशात कुठलीही सत्ता नसतानाही सर्वाधिक सरकारी योजना या बारामती लोकसभा मतदारसंघात राबविल्या. यामध्ये देशात बारामती क्रमांक एकवर आहे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अब की बार, लांबूनच नमस्कार असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारला लगावला. त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. अर्ज दाखल केला त्यावेळी त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यावेळी पुढे म्हणाल्या की, महागाई वाढली असून सिलिंडर तर कालच वाढला आहे. औषधे महागली आहेत, हे फेकू सरकार आहे. मोदींचे तर फेकू सरकार आहेच पण देवेंद्र फडणवीसांचेसुद्धा फसनवीस सरकार असल्याचे सुळे यांनी सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की, आता भाजपवाले अबकी बार म्हणतील. तेव्हा तुम्ही त्यांना लांबूनच नमस्कार म्हणा.

दरम्यान, आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे यांनी अर्ज दाखल केला तर, पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मोहन जोशी यांनी अर्ज दाखल केला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. पुण्यातील नरपतगीर चौकात आघाडीच्या नेत्यांची भाषणे झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सभेत भाजपवर सर्वच वक्त्यांनी टीका केली.

WebTitle : marathi news supriya sule targets pm narendra modi after his allegations on pawar family 

संबंधित बातम्या

Saam TV Live