नोटाबंदीमुळेच परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध झालीच - नरेद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 जानेवारी 2019

सुरत : "घरांच्या किमती कमी करण्यासाठी व युवा पिढीसाठी परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्याचे श्रेय आपल्या सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आहे,'' अशी भलामण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली.

सुरत : "घरांच्या किमती कमी करण्यासाठी व युवा पिढीसाठी परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्याचे श्रेय आपल्या सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आहे,'' अशी भलामण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली.

सुरत विमानतळावरील नव्या टर्मिनलच्या विस्तारीकरणाच्या भूमिपूजनानंतर मोदी बोलत होते. ते म्हणाले, ""मी आतापर्यंत केलेले काम जर पूर्वीच्या सरकारने केले असते, तर त्यांना त्यासाठी आणखी 25 वर्षे लागली असती.'' नोटाबंदीचा फायदा काय?, असा प्रश्‍न मला विचारण्यात येतो. तो तुम्ही युवकांना विचारा, की नोटाबंदीनंतर परवडणाऱ्या किमतीत घरे कोणी खरेदी केली. बांधकाम क्षेत्रात काळा पैसा दाबून टाकण्यात आला होता. नोटाबंदी व "रेरा' कायद्याने आम्ही त्यावर नियंत्रण आणले, असेही ते म्हणाले. 

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या "उडे देश का आम नागरिक' (उडान) या योजनेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. या योजेमुळे देशातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या चार वर्षांच्या सत्ताकाळात सरकारने 1.30 कोटी घरे बांधली. पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात फक्त 25 लाख घरे उभारली गेली.

Web Title: Breaking the ban on the government for providing affordable housing to the younger generation: Narendra Modi

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live