प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपचे सुरेश धस 74 मतांनी विजयी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जून 2018

बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेच्या जागेसाठी पार पडलेल्या मतमोजणीत भाजपचे सुरेश धस तब्बल 74 मतांनी विजयी झाले आहेत. सुरेश धस यांना 526 तर जगदाळेंना 452 मतं पडली.

अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना धोबीपछाड दिल्याची चर्चा या निकालानंतर रंगू लागली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या भावा-बहिणीतील राजकीय द्वंद्वामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.

या निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक असणारे रमेश कराड यांना राष्ट्रवादीच्या गोटात दाखल करून धनंजय मुंडे यांनी भाजपावर कुरघोडी केली होती. मात्र, ऐनवेळी रमेश कराड यांना निवडणुकीचा अर्ज मागे घ्यायला लावून पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने धनंजय मुंडे यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते.

त्यामुळे भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत रंगली होती. काँग्रेसमुळे हा पराभव पदरी पडल्याचा आरोप पराभूत उमेदवार जगदाळेंनी केला आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live