लय दिवसांनी भेटलास भावा, म्हणत रैनाने डायरेक्ट घेतला धोनीचा किस

 लय दिवसांनी भेटलास भावा, म्हणत रैनाने डायरेक्ट घेतला धोनीचा किस

चेन्नई : आयपीएल म्हटल की आपल्या डोळ्यासमोर येतात भारताचे आणि जगातले दिग्गज क्रिकेट खेळाडू आणि त्यांच्या निरनिराळ्या टीम्स. येत्या २९ मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे. यात खेळणाऱ्या आठही संघांनी त्याचा सराव सुरू केला आहे. तसंच चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंनीही सराव सुरू केला आहे. 

आयपीएल सुरू व्हायला अवघे २६ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू पीयूष चावला,अंबाती रायडू, सुरेश रैना आणि एम. एस. धोनी आणि इतर सर्व  खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर हॅंडलवरून धोनी चेन्नईत दाखल झाल्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हीडिओमध्ये धोनीला 'थाला' असं संबोधण्यात आलं होतं. CSKच्या फॅन्सनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दिली होती. या व्हिडीओत हॉटेलचे काही लोकं धोनीला हॉटेल दाखवत होते. हॉटेलमध्ये सगळीकडे धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंचे पोस्टर लावले होते. त्यामुळे हा व्हिडीओ काही सेकंदातच प्रचंड व्हायरल झाला. 

The Reunion we have been waiting for so long #MSDhoni #SureshRaina #WhistlePodu #StartTheWhistles @ChennaiIPL @msdhoni @ImRaina #Master pic.twitter.com/ACRYqd1nNG

— (@Itz_Sparrow0) March 3, 2020

Me3t and Gree7 - Everyday is Karthigai in our House, a film by Vikraman Sir. #StartTheWhistles  pic.twitter.com/sJz77Nnakr

— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 3, 2020

यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडिया टीमनं अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्या व्हिडिओनं फॅन्सची उत्सुकता अधिकच वाढवली. या व्हिडिओमध्ये सुरेश रैना याला 'चिन्ना थाला' या नावानं संबोधण्यात आलं. यात सुरेश रैना पहिले काही सेकंद हॉटेलमध्ये असलेले पोस्टर बघताना पाहायला मिळतोय. त्यानंतर धोनी आणि रैनाची भेट होते आणि हे दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसून येतात. चेन्नई सुपर किंग्सच्या या व्हिडीओमुळे यावर्षी चेन्नई आयपीएल चौथ्यांदा जिंकणार असा विश्वास फॅन्सकडून व्यक्त केला जातोय. 

याआधी एम. एस. धोनीनं सराव करतांनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यात तो नेट प्रॅक्टिस करताना दिसून येत होता. चेन्नई सुपरकिंग्सच्या महत्वाकांक्षा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याच्या आहेत हेच यातून दिसून येतंय. 

IPL २०२० येत्या २९ मार्चपासून सुरू होत आहे. याचा पहिलाच सामना गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.

Web Title suresh raina kisses ms dhoni his neck

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com