सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणाला नवं वळण, एकीकडे मुंबई आणि बिहार पोलिस आमने-सामने तर दुसरीकडे रियाचा खुलासा

साम टीव्ही
शनिवार, 1 ऑगस्ट 2020
  • सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला नवं वळण
  • ईडीने दाखल केला मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा
  • देवेंद्र फडणवीसांनी केलेली ईडी चौकशीची मागणी
  • 15 कोटी रुपयांचा गैरवापर केल्याचा आरोप

शुक्रवारी रात्री मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्यात. बिहार पोलिसांचं एक पथक थेट मुंबईतही दाखल झालं होतं. मात्र या पथकाला मुंबई पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यात पकडलं आहे. मुंबई पोलिसांनी या पथकाला नियम दाखवत मुंबईत तपासाआधी स्थानिक समन्वयक अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याचं सांगितलं. तसंच याची खबरदारी घेण्याची समज दिली. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना परवानगी न घेता आणि स्थानिक पोलिसांना न कळवता तपास केल्याबद्दल कायदेशीर समज दिली आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. ईडीने या प्रकरणात आता मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात ईडी चौकशीची मागणी केली होती. याचदरम्यान आता ही नवीन अपडेट समोर आली आहे. सुशांतसिंह प्रकरणात बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारावर मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी ईडीने याप्रकरणातील एफआयआर आणि इतर कागदपत्र बिहार पोलिसांकडे मागितले होते. तसंच ईडीने रिया चक्रवर्ती कुटुंबाच्या दोन्ही कंपन्यांच्या बँक अकाऊंटची माहिती आणि सुशांतच्या बँक अकाऊंटची माहिती देखील मागवून घेतली होती. याप्रकरणाशी संबधित पैशांचे जे काही व्यवहार झाले आहेत त्याची चौकशी आता ईडीमार्फत केली जाणार आहे. सुशांतच्या वडिलांनी त्यांच्या एफआयआरमध्ये १५ कोटी रुपयांचा गैरवापर केला गेला असल्याचा आरोप केला होता. 

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर येतेय. सुशांतसिंह राजपूत याची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती हिची पहिली प्रतिक्रिया आली आहे. रियाविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतरची तिची ही पहिलीच प्रतिक्रिया तुम्ही साम टीव्हीवर पाहताय. रियाने ही प्रतिक्रिया देऊन आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलंय. तसंच न्यायव्यवसस्थेवर आपला विश्वास आहे असंही ती म्हणाली. बघुयात रिया चक्रवर्तीची एफआयआरनंतरची पहिली प्रतिक्रिया 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live