सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वातावरण पेटलं...वाचा नेमकं काय घडलंय?

साम टीव्ही
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

पालिकेने क्वारंटाइन केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केलीय. महाराष्ट्र सरकारशी याबाबत चर्चा करणार असून, आमच्या पोलीस अधिकाऱ्याला दिलेली वागणूक चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच नितीश यांनी हा कायद्याचा प्रश्न आहे. पोलीस अधिकाऱ्याला अशी वागणूक देणं योग्य नाही, असंही सांगितले.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला अनेक दिवस लोटल्यानंतरही या प्रकरणाच्या तपासादरम्यान रोज नवनव्या गोष्टी घडताहेत. मुंबई महापालिकेने पाटण्याचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारन्टाइन केल्याचं प्रकरण आता चांगलंच पेटलंय. पालिकेने क्वारंटाइन केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केलीय. महाराष्ट्र सरकारशी याबाबत चर्चा करणार असून, आमच्या पोलीस अधिकाऱ्याला दिलेली वागणूक चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं.  तसंच नितीश यांनी हा कायद्याचा प्रश्न आहे. पोलीस अधिकाऱ्याला अशी वागणूक देणं योग्य नाही, असंही सांगितले.

दरम्यान सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी तपासासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेनं क्वारन्टाइन केलं आहे. या IPS अधिकाऱ्याला गोरेगाव येथील CRPFकॅम्पच्या हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आलंय.  तसंच पाटण्याहून आलेल्या इतर पोलिसांनाही क्वारंटाईन करण्याकरता बीएमसीकडून शोधमोहिम हाती घेण्यात आलीय.

दरम्यान या प्रकरणात आता भाजपनेही उडी घेतली असून, महाराष्ट्र सरकार काय लपवू इच्छित आहे असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. तसंच सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशीही मागणी राम कदमांनी केलीय.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांच्या पथकांचं नेतृत्व करण्यासाठी ते पाटण्याहून मुंबईला आले होते.

सुशांत मृत्यूप्रकरणी सध्या राजकारण जोरात असून, सध्या मुंबई पोलिसांवर टीकेचा भडिमार सुरू आहे.. मात्र मुंबई पोलिसांची तपास योग्य दिशेने सुरु असल्याची माहिती देत, गृहमंत्री अनिल देशमुखांनी पोलिसांची पाठराखण केली.


संबंधित बातम्या

Saam TV Live