शिक्षक महासभेची अर्थमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ; शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 मार्च 2018

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासभेची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांसोबतची बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे 26 मार्चला मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासभेने दिला आहे. त्यानंतरही निर्णय न झाल्यास, तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाकडे जमा न करण्याचा करण्याचा इशाराही महासभेने दिलाय. याआधी शिक्षकमंत्री तावडेंनी, कनिष्ठ महाविद्यालयाची शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्याबाबत लिखित आश्वासन दिलं होतं. त्यामुळे 5 मार्चला शिक्षकांनी संप मागे घेतला होता. मात्र 21 मार्चच्या बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्याने पुन्हा शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात उतरले आहेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live