(VIDEO) कापूस, सोयाबीनसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना रस्त्यावर

(VIDEO) कापूस, सोयाबीनसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना रस्त्यावर

संग्रामपूर : कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्यातील वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. आज शनिवारी (ता.20) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवून धरला आहे.

या मध्ये शासन विरोधी घोषणा दिल्या जात आहेत. सोयाबीन आणि कापुस हमी भाव जाहीर करून शेतकऱयांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. ऑनलाईनच्या गोंधळामुळे मागील वर्षी जे शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहले. त्यांना 50 टक्के पिकविम्याची रक्कम देण्यात यावी. अशा मागण्या घेऊन स्वाभिमानीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. वरवट बकाल या मध्यवर्ती ठिकाणी 7 वाजता पासून घोषणा देत वाहने अडविण्यात आले आहेत. रस्त्यावर टायर जाळण्यात येत आहेत.

WebTitle : marathi news swabhimani shetkari sanghatana agitation for FRP of cotton and soybean  

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com