सदाभाऊंवर कुर्डुवाडीत फेकले गाजर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

सोलापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सोलापूर दौऱ्याला आजपासून प्रारंभ झाला. दौऱ्याच्या सुरवातीलाच कुर्डुवाडीत राज्यमंत्री खोत यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून गाजर, तूर व मका फेकून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. 

सोलापूर जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अस्तित्व संपवू लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप रयतक्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले यांनी केला. 

पंढरपूरहून बार्शीकडे जाताना आज सकाळी ही घटना घडली. रिधोरे गावात राज्यमंत्री सदाभाऊ खोत कार्यक्रमासाठी गेल्यानंतर त्यांच्या गाडीवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात माढा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. अवघ्या 25 हजार मतांनी राज्यमंत्री खोत यांचा पराभव येथून झाला होता. यंदाच्या गळीत हंगामात कारखानदारांनी दिलेला शब्द पाळला नसतानाही आक्रमक सदाभाऊंचे पार मांजर झाल्याने शेतकऱ्यांनी हा रोष व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.  

संबंधित बातम्या

Saam TV Live