संपूर्ण देशात पाचगणी नगरपालिका 'एक नंबर' !

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 जून 2018

स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये घेण्यात आलेल्या स्वछ भारत अभियाना अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पाचगणी नगरपालिकेने संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावून संपूर्ण देशात जिल्ह्याची मान उंचवलेलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार पाचगणी नगरपालिकेला देण्यात आला. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. लाखो पर्यटक देशाच्या काना-कोपऱ्यातून इथं फिरण्यासाठी येत असतात. आता याच पाचगणीने आपली ओळख बदललेली आहे. आपल्या देशातील सर्वात क्लीन सिटी म्हणून आता पाचगणीची नवी ओळख तयार झालीय.

इ-टॉयलेट, कचरा निर्मूलन, हागणदारीमुक्त गाव आशा विविध गोष्टींवर मोठ्या प्रमाणावर चळवळ उभी राहिल्या मुळे आणि लोकांनीही यात सहभाग घेतल्यामुळेच आज पाचगणीचा चेहरा मोहराच बदलून गेलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live