सावंतवाडी सामूहिक बलात्काराने हादरली  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचाराच्या घटनेने सावंतवाडी हादरून गेलीय. या प्रकरणातील तीनही नराधमांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. मात्र गृह राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात घडलेल्या या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. सावंतवाडी तालुक्यात एका १६ वर्षीय तरुणीवर तीन नराधमांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ माजलीय.

शुक्रवारी पिडीत तरुणी आपल्या मित्रासोबत शीतपेय प्यायला एका कोल्ड्रिंक हाउस मध्ये गेली होती. हे तिच्या जुन्या फेसबुक फ्रेंड आरोपी रामचंद्र घाडी यानं पाहिले. त्यामुळे बिथरलेल्या आरोपीने तिला घरी नाव सांगण्याची धमकी दिली. तसेच तिला घरी सोडतो असे सांगितले. वाटेत आरोपीने त्या मुलीला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. गुंगीच्या नशेतच तो तिला सावंतवाडी रेल्वे स्थानका जवळील एका लॉज मध्ये घेऊन गेला. तिथेच त्याने रात्रीपर्यंत तिच्यावर अत्याचार केला. अन्य दोन आरोपी राकेश राउळ आणि प्रशांत राउळ यांनीही तिच्यावर अत्याचार केलेत. शनिवारी सावंतवाडी पोलीस स्थानकात रीतसर गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी तात्काळ रामचंद्र घाडी, राकेश राउळ आणि प्रशांत राउळ या संशयित आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिले आहे.

दरम्यान या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. आरोपीला अल्पवयीन मुलगी सोबत असताना देखील लॉज भाड्याने देणाऱ्या लॉज चालकाविरुद्ध कारवाईची मागणी मनसेनं केलीय. विशेष म्हणजे हा लॉज शिवसेनेशी संबंधित व्यक्तीचा असल्यामुळे कारवाईत दिरंगाईचा आरोप करत मनसे आणि स्वाभिमान आक्रमक झालेत. तसेच पालकमंत्री दीपक केसरकर पोलिसांवर दबाव टाकू शकतात असा संशय मनसे नेते परशुराम उपरकर यांनी व्यक्त केलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live