पुण्यात स्वाईन फ्लूचे थैमान; नाशिकमद्येही परिस्थिती गंभीर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

स्वाइन फ्लूने शहरात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे महापालिकेने सोमवारी दिली. पावसाळी हवेमुळे स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ विषाणूंचा संसर्ग वाढत आहे; पण नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.  

स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्या दोन महिला पुण्यातील राहणाऱ्या होत्या; तर, एक रुग्ण उस्मानाबाद येथून उपचारांसाठी पुण्यात आला होता. या महिन्यातील ३, १९ आणि २१ तारखांना या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  आरोग्य खात्याने नुकत्याच घेतलेल्या ‘डेथ रिव्ह्यू मीटिंग’मध्ये या तीनही रुग्णांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे शिक्कामोर्तब केले.

त्यानंतर महापालिकेने स्वाइन फ्लूमुळे शहरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृत्यू झालेल्या महिला ३६, ६० आणि ५५ वयोगटातील होत्या. तर नाशकात स्वाईन फ्लूचा उपचार घेताना आतापर्यंत सात जणांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. या आजाराची २१ जणांना लागण झाली असून, सध्याचे वातावरण स्वाईन फ्लू पसरविण्यास हातभार लावतो आहे. 

मागील वर्षापासून थंड झालेल्या स्वाईन फ्लूने यंदा पुन्हा हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live