तबलिगी जमातनं भारतीयांची जाहीर माफी मागावी - मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी

तबलिगी जमातनं भारतीयांची जाहीर माफी मागावी - मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी

तबलिगी जमातनं भारतीयांची जाहीर माफी मागावी अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळानं केलीय. देशात करोनाच्या फैलावाला आणि सामाजिक तेढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेल्या तबलिगी जमातनं सर्व भारतीयांची जाहीर माफी मागावी, यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळ आग्रही आहे. एका पत्रकाद्वारे त्यांनी माफीची मागणी केलीय. 

सध्या सगळीकडे चर्चा रंगलीय ती तबलिगी जमातीची. त्यांच्यामुळेच भारतात कोरोनाचा प्रसार वाढला असा आरोप होतोय. दिल्लीच्या निजामुद्दीम भागात 15 ते 17 मार्च दरम्यान एक कार्यक्रम झाला. त्यात अनेक लोक सहभागी झाले होते. देशात कोरोनाच्या केसेस वाढत असतानाच अनेक लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. 

हे लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून आले होते आणि ते परत आपापल्या भागात गेले. त्यापैकी 1,830 जणांची ओळख पटली आहे, असं दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितलं आहे. गर्दी करण्यास मनाई केलेली असतानाही हे लोक तिथे जमले.  नि त्यांच्यामुळे भारतात कोरोनाचा फैलाव झाला. यामुळे भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढलाय. तब्बल 3 हजारांच्या वर हा आकडा पोहचलाय. तर यात 40 टक्के तबलिगी समाजाच्या मार्कजमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. 

दरम्यान या तबलिगी समाजानं भारतीयांची याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळानं केलीय.  देशात सामाजिक तेढ निर्माण करणे आणि कोरोनाचा फैलाव करणे याला तबलिगी समाज जबाबदार आहे. त्यामुळे त्यांनी भारताची जाहीरपणे माफी मागावी यासाठी मुस्लिम सत्यशोधक समाज आग्रही आहे. तशी माहितीही त्यांनी पत्रकाद्वारे दिलीय. 

Web Title - marathi news The Tabligi tribe should apologize to Indians - demand of Muslim Truth Board


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com