ताहिरा कश्यपला कर्करोग

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

मुंबई - इर्फान खान, सोनाली बेंद्रे यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. आता अभिनेता आयुषमान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप दिला देखील कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. याबाबत तिने आपल्या सोशल मिडिया अकांउटवर माहिती दिली आहे. 

इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमध्ये तिने, ''मी टाकलेल्या छायाचित्रामुळे तुम्हाला धक्का बसेल, पण हे सत्य आहे. मला स्तनांचा कर्करोग झाला आहे. खरंतर कर्करोगाच्या आधीची ही स्टेज आहे. या टप्प्यावर शरीराच्या रोगग्रस्त भागातील पेशी वेगाने वाढतात. 'एक स्तन काढल्यामुळे मी आता अँजेलिना जोलीचा भारतीय अवतार झाले आहे. या आजाराने मला जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला. जीवनातील अनिश्चिततेचा आदर करायला हवा व स्वत:वर विश्वास ठेवायला हवा हे मी यातून शिकले आहे''. असे म्हटले आहे.

WebTitle : marathi news tahira kashyap suffering from cancer 

संबंधित बातम्या

Saam TV Live