मोबाईल कुठेही चार्ज करताय, मग पैसे गेलेच समजा!

मोबाईल कुठेही चार्ज करताय, मग पैसे गेलेच समजा!

तुमचा मोबाईल फोन चार्ज करणं यापुढे चांगलंच महागात पडू शकतं. तुमच्या जराशा निष्काळजीपणामुळे चार्जिंगदरम्यान,  तुमचं अख्खं बँक खातं क्षणार्धात रिकामं होऊ शकेल. नेमका हा सगळा प्रकार काय आहे, हे जाणून घेणं, अत्यंत महत्त्वाचंय. नाही तुमची मेहनतीची कमाई क्षणार्धात नाहीशी होऊ शकते. 

चार्चिंग  स्टेशनवर मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर सांभाळून! तुमची जराशी चूक किंवा निष्काळजीपणा तुमच्या बँकेचं खातं रिकामं करेल. आणि हा इशारा दिलाय भारतीय स्टेट बँकेनं.

स्टेट बँकेने आपल्या ट्वीटमध्ये काय म्हटलंय?

चार्जिंग स्टेशनवर तुमचा फोन चार्ज करण्याआधी दोनवेळा विचार करा. एखादं मालवेअर तुमच्या फोनमध्ये शिरून मोबाईलमधील डेटा आणि पासवर्ड हँकर्सपर्यंत  पोहोचवण्याचं माध्यम ठरू शकतं.

मोबाईल चार्जिंगमुळे कशी होते चोरी?

ज्यूस हॅकिंगच्या माध्यमातून ही डेटा चोरी केली जाते. चार्जिंग पोर्टच्या माध्यमातून होणारा हल्ल्याला ज्यूस हॅकिंग म्हणतात..चार्जिंग स्टेशनवर मोबाईल फोन चार्जिंगला लावला तर यूएसबी पोर्टच्या माध्यमातून मोबाईल फोनमधील सर्व डेटा कॉपी केला जातो. त्यामुळे अज्ञात ठिकाणी फोन चार्ज करण्याआधी अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे अज्ञात स्थळी चार्जिंगला मोबाईल लावण्याआधी दोनदा विचार करा. 

चार्जिंग स्टेशनवर फोन चार्ज करताना, तिथल्या इलेक्ट्रिक सॉकेटवर लक्ष ठेवा. आपली स्वतःची चार्जिंग केबल किंवा पॉवर बँक सोबत ठेवणं उत्तम. केवळ इलेक्ट्रिक आउटलेट असेल, अशाच ठिकाणी फोन चार्ज  करावा.

काय काळजी घ्यावी?

अनेकदा मोबाईलची बॅटरी संपत असल्यामुळे तुम्ही कुठेही चार्जिंग करण्याला प्राधान्य देता. मात्र यापुढे असं करताना काळजी घ्या. शक्यतो, मोबाईल कुठेही चार्ज करु नका. किंवा बॅटरी बँक वापरण्याचा पर्याय अवलंबता येऊ शकतो.

मोबाईलची बॅटरी पुन्हा चार्ज करता येऊ शकते. पण मेहनतीची गेलेली कमाई जर का गायब झाली, तर काय कराल? त्यामुळे नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच खबरदारी बाळगा. 

Web Title - Take care when you charge mobile...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com