आगीचे गोळे आकाशातून कोसळले ?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 28 जुलै 2019

बेबडओहोळ : शनिवार सायंकाळच्या वेळेस मुसळधार पाऊस सुरू असताना अचानकपणे आकाशातून आगीचे गोळे पडल्याचे दिसल्याने आढे गावातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

बेबडओहोळ : शनिवार सायंकाळच्या वेळेस मुसळधार पाऊस सुरू असताना अचानकपणे आकाशातून आगीचे गोळे पडल्याचे दिसल्याने आढे गावातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

शनिवार सायंकाळच्या वेळेस मुसळधार पाऊस चालु असताना द्रुतगती महामार्गावर वसलेले आढे गावातील डोंगराजवळ आकाशातून काही आगीचे गोळे जमिनीकडे येताना येथील तरूण किरण सुतार यांनी पाहिले. यानंतर सुतार यांनी तात्काळ फोटो व व्हिडीओ काढले. यानंतर सर्व गावात बातमी पसरल्याने याबाबत नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

गावातील तरूणांनी गावाजवळील डोंगरीही पिंजून काढला. माञ, त्यांच्या हाती काही लागले नाही. याबाबत सुतार म्हणाले, ''मी आकाशातून आगीच्या गोळेगत पडणाऱ्या वस्तु बघीतल्या माञ,त्या काय होत्या हे समजले नाही.

Web Title: Talks about fire balls fell from the sky in Aadhe Village

संबंधित बातम्या

Saam TV Live