अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा येणार एकत्र 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 एप्रिल 2018

पिंक चित्रपटातून तापसी पन्नू प्रेक्षकांना माहित झाली. त्या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी तिला मिळाली होती. आता तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. सुजय घोष यांच्या चित्रपटासाठी दोघांना साईन करण्यात आले आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी तापसीला साईन करण्यात आले आहे.

हा चित्रपट सुनिर खेत्रपाल निर्मित असणार आहे; तर सुजय घोष हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. अमिताभ यांनी नुकतेच "ठग्स ऑफ हिंदोस्तान'चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. तर तापसीही तिच्या आगामी चित्रपटांच्या तयारीत आहे. अमिताभ यांच्याकडे या वर्षी "से रा नरसिंहा रेड्डी', "ब्रम्हास्त्र' हे चित्रपट आहेत; तर त्यांचा ऋषी कपूर यांच्याबरोबरच "102 नॉट आऊट' प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तापसी आणि अमिताभ यांना परत एकत्र काम करताना बघायला कोणाला मजा येणार नाही? 

संबंधित बातम्या

Saam TV Live