शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्‍न सोडवणार 'टास्क फोर्स'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 जून 2019

नाशिक - जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी "टास्क फोर्स' निर्माण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या पुढाकारातून पोलिस, सहकार, बॅंकिंगसह विविध घटकांच्या एकत्रित प्रयत्नातून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्‍न सोडविण्यावर प्रस्तावित टास्क फोर्सचा भर असेल.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. वर्षाला शंभराच्या पुढे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होतात. यंदा सहा महिन्यांत 42 च्या आसपास आत्महत्या झाल्या. त्यावर उपायासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत विविध यंत्रणांना एकत्र केले.

उपाययोजनांसाठी टास्क फोर्सचे प्रयत्न चालविले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक, विद्यापीठाचे कुलगुरू, सामाजिक अभ्यासक, अग्रणी बॅंकेसह विविध बॅंकांचे पदाधिकारी अशा सगळ्यांना एकत्र आणून हा टास्क फोर्स काम करणार आहे.

Web Title: Task Force Control for Farmer Suicide

संबंधित बातम्या

Saam TV Live