देशात कोरोनाचा पसरवण्यास मोठ्या प्रमाणावर जबाबदार तबलिग जमातीची आता खैर नाही...

देशात कोरोनाचा पसरवण्यास मोठ्या प्रमाणावर जबाबदार तबलिग जमातीची आता खैर नाही...

देशात कोरोनाचा फैलाव होण्यास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असणाऱ्या तबलिघी जमातीची आता खैर नाही, कारण मरकज प्रकरण समोर आल्यानंतर आता तबलिगींच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केलीय. दिल्ली पोलिसांनी मरकजचे अध्यक्ष मौलाना साद कंधालवी याच्यासहित कोअर कमिटीच्या सात सदस्यांना नोटीस धाडलीय. पोलिसांनी कोअर कमिटीकडे मरकज आणि निजामुद्दीन स्थित मुख्यालयाचं फंडिंग कुठून येतं? याबद्दल माहिती देण्याची मागणी केलीय. त्याचसोबत जमातनं गेल्या तीन वर्षांत किती कर भरला आहे, ही माहितीही मागवलीय. जमातच्या खात्यात किती आणि कुठून पैसे आले याचीही माहिती पोलिस घेतायंत. त्याचसोबत तबलिगी जमातीच्या कोअर कमिटीकडे पॅन क्रमाकांचीही मागणी करण्यात आलीय.

पाहा, सविस्तर व्हिडीओ -

१ जानेवारी ते १ एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांची संख्या, नकाशा किंवा साईट प्लान आणि परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींचीही माहिती 'जमात'ला द्यावी लागणार आहे. १२ मार्चनंतर सहभागी झालेल्या लोकांच्या माहितीसहीत ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग तसंच ओरिजनल रजिस्टरचीही पोलिसांनी मागणी केलीय. परदेशातून भारतात आलेल्या तबलिगींची संख्या, त्यांना मदत करणाऱ्या भारतीय व्हिजा कंपन्यांची नावंही पोलिस शोधत आहेत.

मरकजमध्ये सामील झालेल्या शेकडो तबलिगी जमातच्या कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झालीय. या कार्यक्रमात सामील झालेल्यांमुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोना झाल्याची प्रकरणं समोर येत आहेत. एकीकडे लॉकडाऊन असताना दुसरीकडे अत्यंत बेजबाबदार वर्तन तबलिगींकडून करण्यात आलंय. त्यामुळेच दिल्ली पोलिसांसह केंद्रीय गृह मंत्री अमित शहांनी याची गंभीर दखल घेतलीय. त्याचाच परिणाम म्हणून कोरोनाला जबाबदार असणाऱ्या तबलिगींची आर्थिक नाकेबंदी करुन मुसक्या आवळायला सुरुवात झालीय.

Web Title - marathi news  The Tbilig tribe's reality who is largely responsible for spreading the Corona in the country.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com