शिक्षकदिनी विनाअनुदानित शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा

तुषार रूपनवर, साम टीव्ही, मुंबई 
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

आपल्या विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचं गेल्या 22 दिवसांपासून आंदोलन सुरूंय. काल पोलिसांनी दंडुकेशाही करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. यात पाच शिक्षक गंभीररित्या जखमीही झाले. मात्र हे आंदोलन आता आणखीनच चिघळलंय. सोमवारी शिक्षमंत्र्यांसोबत झालेली बैठक फिसकटल्यानं शिक्षकांनी करो या मरोचा पवित्रा घेतलाय.

दरम्यान शिक्षक आमदार नागो गाणार आंदोलनस्थळी दाखल होताच काही संतप्त आंदोलकांनी त्यांना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. 

आता सर्वच शिक्षक आंदोलकांचं लक्ष बुधवारच्या कॅबिनेट बैठकीकडे असेल. या बैठकीतही सकारात्मक तोडगा निघाला नाही तर शिक्षकदिनी आत्मदहनाचा इशारा शिक्षक आंदोलकांनी दिलाय. 

WebTitle : marathi news teachers agitation in mumbai becomes aggressive  

संबंधित बातम्या

Saam TV Live