विनाअनुदानित शिक्षकांच्या लढ्याला अखेर यश

तुषार रुपनवर, साम टीव्ही, मुंबई
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या लढ्याला अखेर यश मिळतांना दिसतंय. राज्यातल्या विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. ज्यांना आधी 20 टक्के अनुदान मिळायचं त्यांना 40 टक्के अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.

गेल्या 23 दिवसांपासून विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनकर्त्या शिक्षकांवरच पोलिसांनी निर्घृण लाठीमार केला. शिक्षकांवर झालेल्या या लाठीमाराची दखल घेणारं एकमेव चॅनेल होतं साम टीव्ही. शिक्षकांनीही साम टीव्हीनं त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आभार मानले.

सरकारनं या शिक्षकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असला तरी शिक्षक मात्र लेखी आश्वासनवर ठाम आहेत. जोवर सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही. तोवर आपला लढा सुरूच राहिल अशी भूमिका शिक्षकांनी घेतलीय. 

marathi news teachers agitation successful government to give 20 percent grant

संबंधित बातम्या

Saam TV Live