...याच कारणासाठी टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा भरावा लागला दंड!

...याच कारणासाठी टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा भरावा लागला दंड!

हॅमिल्टन : येथे भारत-न्यूझीलंड या संघांदरम्यान झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये यजमान न्यूझीलंड संघाने रोमहर्षक विजय साजरा केला. टीम इंडियाने दिलेलं 348 धावांचं टार्गेट 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत किवीजने 4 विकेटने सामना खिशात घातला. आणि मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली. 

भारताने उभारलेला धावांचा डोंगर पाहता ही मॅच न्यूझीलंडला जड जाणार असे वाटत होते मात्र, रॉस टेलरने जुनं ते सोनं हे सिद्ध केले. आणि पहिल्या वन-डे मॅचमध्ये न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. पण, दुसरीकडे टीम इंडियाला पराभवासोबत आणखी एका गोष्टीचा फटका सहन करावा लागला.

निर्धारित वेळ संपून गेल्यानंतर 4 ओव्हर टाकल्याची शिक्षा आता टीम इंडियाला सहन करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या मानधनातील 80 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार असल्याची घोषणा सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी केली. 

... यामुळे सलग तिसऱ्यांदा झालाय दंड!

या अगोदर झालेल्या टी-20 मालिकेतही टीम इंडियावर दोनवेळा कारवाई करण्यात आली आहे. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात निर्धारित वेळ न पाळल्याने टीमला आयसीसीच्या शिक्षेला सामोरं जावं लागलं आहे. टीमच्या मानधनातील अनुक्रमे 20 आणि 40 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली होती. त्यानंतर आता पहिल्यावहिल्या वन-डे मॅचमध्येही टीम इंडियाला याच कारणासाठी दंड ठोठावण्यात आला आहे. 

तीन वन-डे सामन्यांचा मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी मॅच शनिवारी (ता.15) होणार असून यामध्ये टीम इंडिया कसे कमबॅक करते, याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष्य लागून राहिले आहे. 

International Cricket Council (ICC): India have been fined 80 percent of their match fee for a slow over-rate in the first ODI against New Zealand. #IndiaVSNewZealand (Pic source: ICC) pic.twitter.com/bHG98quJHB

— ANI (@ANI) February 5, 2020

Web Title team india fined slow over rate hamilton 1st odi against new zealand

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com