टीम इंडियानं केला 203 धावांनी इंग्लंडचा दणदणीत पराभव 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नॉटींगहॅमच्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियानं इंग्लंडचा 203 धावांनी दणदणीत पराभव केलाय. सध्या इंग्लंडकडे 2-1 अशी विजयी आघाडी आहे,पण टीम इंडियानं आपलं मालिकेतलं आव्हान कायम ठेवलंय.  इंग्लंडचा दुसरा डाव 317 धावांमध्ये गुंडाळण्यात भारताला यश आलंय.

पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच इंग्लंडचा खेळ खल्लास झाला. पण कालच्या दिवसभरात स्टोक्स आणि बटलरच्या पार्टनरशीपमुळं भारताला घाम फोडला होता, पण बुमराहला ही पार्टनरशीप फोडण्यात यश आलं आणि भारतानं विजयावर शिक्कामोर्तब केलं.

इंग्लंडसमोर विजयासाठी 521 धावांचं आव्हान होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडची अवस्था 4 बाद 84 अशी केविलवाणी झाली होती. पण बटलर आणि स्टोक्सनं टिच्चून फलंदाजी करत पाचव्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी रचून भारताचा विजय लांबवला. बटलरनं 106 धावांची, तर स्टोक्सने 62 धावांची झुंजार खेळी उभारली. भारताकडून जसप्रीत बुमराने सर्वाधिक पाच विकेट्स घेतले, तर ईशांत शर्मानं दोन, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या आणि आर अश्विननं प्रत्येकी एक विकेट घेतली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live