'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' चा टीझर प्रदर्शित 

 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' चा टीझर प्रदर्शित 

मुंबई- भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' असे या चित्रपटाचे नाव आहे. विकी कौशल आणि यामी गौतम यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. तर मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी, रॉनी स्क्रूवाला यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाचे पोस्टर जसे दमदार आहे तसेच, चित्रपटाचा टीझरही दामदार आहे.

जम्मू काश्मीरच्या 'उरी' येथे झालेल्या भारत-पाकिस्तानच्या हल्ल्यात 19 भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित 'उरी' हा सिनेमा बनवण्यात आहे. चित्रपटात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्या भूमिकेत परेश रावल झळकणार आहेत. तर मराठी अभिनेते- दिग्दर्शक योगेश सोमण हे चित्रपटामध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. टीझरमध्ये त्यांची झलक पाहायला मिळते.

दरम्यान, उरीतील लष्करी कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 11 दिवसांनी लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त केली होती. या हल्ल्यात अनेक दहशतवादी प्रशिक्षणाचे तळ नष्ट करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले सर्व जवान नंतर सुरक्षितपणे भारतात परतले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com