मुंबईकरांनो तब्बेत संभाळा.. पुढचे २४ तास मुंबईत राहणार उष्णतेची लाट    

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 मार्च 2018

मुंबई आणि ठाणेकरांना आज विदर्भातल्या उन्हाळ्याचा आणि उकाड्याची अनुभूती येतेय. राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद मुंबईत झालीय. मुंबईत पारा 41अंशावर तर ठाण्याचं तापमान 40 अंश सेल्सियस नोंद झालीय. मुंबईत तापमानाने अचानक उसळी घेतली. मुंबईत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. तर ठाण्यात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय..पूर्वेकडून जमिनीवरून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात अचानक वाढ झालीय. पुढील चोवीस तासांत मुंबईत उष्णतेच्या लाटेच्या सदृश परिस्थिती राहील. त्यामुळे आजचा दिवसही मुंबईकरांचा 'ताप'दायक जाण्याची चिन्हे आहेत...

मुंबई आणि ठाणेकरांना आज विदर्भातल्या उन्हाळ्याचा आणि उकाड्याची अनुभूती येतेय. राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद मुंबईत झालीय. मुंबईत पारा 41अंशावर तर ठाण्याचं तापमान 40 अंश सेल्सियस नोंद झालीय. मुंबईत तापमानाने अचानक उसळी घेतली. मुंबईत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. तर ठाण्यात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय..पूर्वेकडून जमिनीवरून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात अचानक वाढ झालीय. पुढील चोवीस तासांत मुंबईत उष्णतेच्या लाटेच्या सदृश परिस्थिती राहील. त्यामुळे आजचा दिवसही मुंबईकरांचा 'ताप'दायक जाण्याची चिन्हे आहेत... विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर गेला असून, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही बहुतांश ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. पुढील आठवडय़ात राज्याच्या सर्वच भागांतील किमान आणि कमाल तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे... 


संबंधित बातम्या

Saam TV Live