मुंबईसह राज्याच्या वातावरणात बदल 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

मुंबईसह राज्याच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत असून, मुंबईच्या किमान तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत आहे. मुंबईतील किमान तापमान 18 हून 22 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून कमाल तापमानही 32 अंशांवर पोहोचले आहे. एकिकडे मुंबई तापली असताना, दुसरीकडे राज्याला गारांचा इशारा कायम आहे. 24 फेब्रुवारी रोजी उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live