राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार आमच्या संपर्कात - प्रकाश आंबेडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 जून 2019

मुंबई -  राज्यातील अख्खा कॉंग्रेस पक्ष तसेच राष्ट्रवादीचे दहा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत मोठी संधी असून, भाजपसोबत शिवसेनेने युती केल्यामुळे मराठी अस्मितेची निर्माण झालेली पोकळी राज ठाकरेंना किंगमेकर बनवू शकेल, असे विधानही त्यांनी या वेळी केले. मात्र राज ठाकरेंच्या "मनसे' सोबतची संभाव्य आघाडीची शक्‍यताही त्यांनी फेटाळून लावली. 

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाबाबतही त्यांनी या वेळी मते मांडली. राज्यात औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी मुस्लीम मतदार सोबत न आल्याने लोकसभेत वंचित आघाडीचा पराभव झाल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीसाठी आमची कॉंग्रेससोबत आघाडी होईल की नाही याबाबत अद्याप काहीच सांगू शकत नसल्याचेही आंबेडकरांनी नमूद केले. दरम्यान, आंबेडकरांनी विधानसभेसाठी राजू शेट्टी यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. सध्या प्रमुख कार्यकर्त्यांची राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे. पुढच्या काळात शेट्टींनी कुणासोबत जायचे ते लवकर ठरवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Ten NCP MLA in touch with us says prakash ambedkar

संबंधित बातम्या

Saam TV Live