ओव्हरटेक बेतला बारा प्रवाशांच्या जीवावर..! थरारक प्रसंग...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

नाशिक / येवला : मनमाड-येवला मार्गावर हॉटेल अपेक्‍ससमोर बस-कंटेनर अपघातात सुमारे 10 ते 12 प्रवासी जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून, नाशिकला उपचारासाठी हलविले आहे. दैव बलवत्तर म्हणून अनेक प्रवाशांचे प्राण वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

असा घडला प्रसंग...

गुरुवारी (ता. 27) सायंकाळी मनमाड आगाराची बस (एमएच 12, ईएफ 6965) श्रीरामपूरकडे जात होती. येवल्याच्या पाठीमागे हॉटेल अपेक्‍सजवळ बसचालक कंटेनरला ओव्हरटेक करीत असताना, पुढे चालत असलेल्या ट्रॅक्‍टरवर धडकला. या धडकेत रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन बस पडली. अपघातात बसचा एका बाजूचा पत्रा पूर्णतः कापला गेला. अपघात होताच प्रवाशांनी बसमधून उतरून स्वत:चा जीव वाचविला. बसचालक राजू हटकर (वय 58) यांना पोटाला जबर मार लागला असून, वाहक परबत तायडे (वय 37) यांनाही कंबरेजवळ मार लागला. त्या दोघांनाही नाशिकला हलविले आहे. 

फिर्यादीवरून पोलिसांनी केला गुन्हा दाखल

कोमल तंबोरे (25), अमोल जोशी (38), रमणकुमार (38), साहेबराव मांजरे (65, सर्व रा. येवला), अशोक सोनवणे (55, देवगड), अतुल मोरे (28, रा. पाटेगाव) आदी प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रॅक्‍टरचालक सर्जेराव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title Ten Passengers Were Injured In The Bus Container Accident 

संबंधित बातम्या

Saam TV Live