VIDEO | कोल्हापुरात विचित्र आजाराची दहशत

साम टीव्ही
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020
  • कोल्हापुरात विचित्र आजाराची दहशत
  • तापासह लोकांच्या हातापायांना सूज 
  • कोरोनामुळे उपचारही मिळेनात 

कोल्हापूर सध्या एका विचित्र आजाराने हादरलंय. हा आजार नेमका कुठला आहे? याचं निदानच होत नाहीये. बघुयात कोल्हापुरात नेमकं काय घडतंय. पाहा,
आधीच कोरोनाने थैमान घातलंय. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. अशात कोल्हापुरात एका नव्या आजाराची दहशत पसरलेय. ज्याचं निदानही होतं नाहीये. 

 या आजाराची लक्षणं काय आहेत? 

या रुग्णांना ताप येणं, अंग दुखणं, कमरेच्या खाली प्रामुख्याने पायाला सूज येणं, हातांनाही सूज येणं अशी लक्षणं दिसत आहेत. वेदनेमुळे रुग्णांना झोपूनच राहावं लागतंय. कोल्हापूर शहरातील रामानंदनगरच्या जाधव पार्क, गुरुकृपा कॉलनी, बळवंतनगर परिसरात हे रुग्ण आढळलेत.

आपल्याला काय झालंय हे कळतंच नसल्याने लोकांनी डेंग्यू आणि चिकनगुनियाचीही चाचणी केली.. मात्र तीही निगेटिव्ह येतेय. हा व्हायरल ताप असल्याचंही काही डॉक्टर म्हणतायत. परिसरातील डास आणि अस्वच्छता अशा आजारांना आमंत्रण देतेय, असा आरोप आता स्थानिक करतायत. त्यामुळे महापालिकेने कोरोनाच्या या काळात नवी संकटं टाळण्यासाठी तरी खबरदारी घ्यावी, असं आवाहन भयभीत नागरिक करतायत.


संबंधित बातम्या

Saam TV Live