जम्मू-पठाणकोट हायवेवरील आर्मी कॅम्पवर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा हल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

जम्मू-काश्मीरमधील सुंजुवान परिसरातील जम्मू-पठाणकोट हायवेवरील आर्मी कॅम्पवर, जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. पहाटे 4.50च्या सुमारास तीन ते चार दहशतवादी अंदाधूंद गोळीबार करत आर्मी कॅम्पच्या रहिवासी भागात शिरले. या गोळीबारात एका जवानासह चिमुरडीचा मृत्यू झालाय. तर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात जैशच्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलंय. दरम्यान दोन्ही बाजूने गोळीबार थांबला असून परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसले आहेत का याचा ड्रोनच्या सहाय्याने शोध घेतला जातोय.

जम्मू-काश्मीरमधील सुंजुवान परिसरातील जम्मू-पठाणकोट हायवेवरील आर्मी कॅम्पवर, जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. पहाटे 4.50च्या सुमारास तीन ते चार दहशतवादी अंदाधूंद गोळीबार करत आर्मी कॅम्पच्या रहिवासी भागात शिरले. या गोळीबारात एका जवानासह चिमुरडीचा मृत्यू झालाय. तर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात जैशच्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलंय. दरम्यान दोन्ही बाजूने गोळीबार थांबला असून परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसले आहेत का याचा ड्रोनच्या सहाय्याने शोध घेतला जातोय. जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराने अलर्ट जारी केला असून संपूर्ण परिसराला लष्करी छावणीचं रुप आलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live