प्रसादातून विषबाधेची शक्यता; गणेशोत्सवावर दहशतवादाचं सावट..

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

राज्यात पुढील आठवड्यापासून गणेशोत्सवाची धूम असणारंय. मात्र कुरापती पाकिस्तानच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आलाय.

दहशतवादी गणेशोत्सवाचा फायदा घेऊ शकतात. प्रसादाच्या माध्यमातून विषबाधा केली जावू शकते. त्यामुळं अन्न आणि औषधी प्रशासनानं सर्व गणेश मंडळांना नोटीस देऊन अर्लट केलंय.

प्रसाद तयार करताना काय खबरदारी घ्यावी यासाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. तसंच इतर कुणी मंडळाच्या प्रसादासोबत बाहेरचा प्रसाद एकत्रित करण्याचा प्रयत्न करत असेल तर करू नका, असंही सांगण्यात आलंय. 

गणेशोत्सवादरम्यान कुठलाही घातपात होऊ नये यासाठी प्रशासन आणि मंडळानं कंबर कसलीय. मात्र, नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. सजग गणेशभक्तांची तीक्ष्ण नजर दहशतवादाचं हे विघ्न दूर करू शकते. 

संबंधित बातम्या

Saam TV Live