(VIDEO) दहशतवादी ते देशभक्त ; लान्स नाईक नझीर अहमद वणी यांची कहाणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 26 जानेवारी 2019

ही कहाणी आहे.. दहशतवादाचा मार्ग सोडलेल्या एका देशभक्ताची. या देशभक्ताचं नाव आहे.. नझीर अहमद वणी. दहशतवादाचा मार्ग सोडून नझीर वणी सैन्यात दाखल झाले. दक्षिण काश्मिरात दहशतवाद्यांविरोधातील अनेक चकमकींमध्ये त्यांनी सहभाग घेतला.

गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी शोपियाँमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलं. लष्करी इतमामात लान्स नायक नझीर वणी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दहशतीचा मार्ग सोडून सन २००४मध्ये नझीर वणी लष्करात दाखल झाले होते. ३८ वर्षांचे असलेले वाणी हे मूळचे कुलगाममधील अशमुजीचे. त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल नाझीर वाणी यांना सेना पदकानेही गौरवण्यात आले होते. आणि आता त्यांच्या बलिदानाचा सन्मान त्यांना अशोकचक्र देऊन करण्यात आलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live