बुऱ्हाण वानीच्या मृत्यूदिनी हल्ल्याचा दहशतवाद्यांचा प्लान; जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 जुलै 2019

8 जुलै 2016, तीन वर्षांपूर्वी, याच दिवशी हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वानीचा भारतीय जवानांनी खात्मा केला. आता तीन वर्षानंतर वानीच्या खात्म्याचा बदला घेण्याचा नापाक प्लान मुजहिद्दीन आखत असल्याची माहिती आहे. बुऱ्हाण वानीच्या मृत्यूदिनी पुलवामात दहशतवादी भारतीय जवानांना लक्ष्य कऱण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये लपलेल्या 6 ते 8 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारस्थानाचा छडा सुरक्षा दलांनी लावलाय. यामध्ये एका स्नायपर एक्सपर्ट्सचाही समावेश आहे. काश्मीरमध्ये लपून राहण्यासाठी या दहशवाद्यांनी आपली नावंसुद्धा बदललीत. हल्ल्यासाठी आयईडी आणि स्नायपरचा वापर होण्याची दाट शक्यता आहे. 

14 फेब्रुवारीला पुलवामात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात 40 हून अधिक जवान शहीद झाले होते. आता पुन्हा एकदा हिज्बुल मुजाहिदीन हल्ल्याचा डाव आखतोय. मात्र यावेळी सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. त्यामुळं भारतीय जवान मुजाहिद्दीनचा हा डाव उधळून लावणार हे नक्की.

WebTitle : marathi news terrorist planning new attack against security forces of india on the birthday of buhran wani

संबंधित बातम्या

Saam TV Live