शोपियानमधून अपहरण केलेल्या 4 पैकी 3 पोलिसांची हत्या.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

जम्मू कश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातून दहशतवाद्यांनी चार पोलिसांचे अपहरण करून त्यातील तिघांची निघृणपणे हत्या केली आहे. या तीनही पोलिसांचे मृतदेह पोलिसांना सापडल्याने खळबळ उडाली आहे. अपहरण करण्यात आलेल्या एका पोलिसाची दहशतवाद्यांनी सुटका केली आहे.

शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी या पोलिसांच्या घरात घुसून त्यांचे अपहरण केले होते. दरम्यान हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने या हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपहरण झालेल्या पोलिसांमध्ये तीन विशेष पोलीस अधिकारी तर एक पोलीस अधिकारी आहे.

फिरदोस अहमद कुचे, कुलदीप सिंग, निसार अहमद धोबी, फयाझ अहमद भाट अशी अपहरण करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. यातील फक्त फय्याझ अहमद भाट याची पोलिसांनी सुटका केली आहे. या सर्व पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांसमोरच बंदुकीचा धाक दाखवत घरातून पळवून नेण्यात आले असल्याचे समजतंय.

WebTitle : marathi news  Terrorists abduct kill three policemen in Kashmir's Shopian

संबंधित बातम्या

Saam TV Live