'ठाकरे'ला पहाटे साडेचार वाजता दणक्यात सुरवात!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कारकिर्द सोनेरी पडद्यावर दाखवणारा असा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'ठाकरे' हा चित्रपट आज (ता. 25) सर्वत्र प्रदर्शित झाला. वडाळ्यातील कार्निव्हल थिएटर येथे पहाटे साडेचार वाजता या चित्रपटाचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' प्रदर्शित झाला. चाहत्यांची प्रचंड गर्दी व ढोल-ताशाच्या गजरात 'ठाकरे' चित्रपटाला दणक्यात सुरवात झाली. 

'ठाकरे'च्या या 'फर्स्ट शो'चे उद्घाटन चित्रपटाचे दिग्दर्शक व मनसेचे नेते अभिजीत पानसे यांच्या हस्ते करण्यात आले. गेले अनेक दिवसांपासून हा चित्रपट काही ना काही कारणाने चर्चेत होता. आज अखेर तो सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 'ठकरे'च्या स्पेशल स्क्रिनिंगला चित्रपटाचे निर्माते व खा. संजय राऊत व अभिजीत पानसे यांच्यात मानापमान नाट्य घडले होते. स्पेशल स्क्रिनिंगला दिग्दर्शकालाच थिएटरमध्ये जागा राखीव न ठेवली गेल्यामुळे पानसेंना आल्या पावली परत जावे लागले होते. यावरून सोशल मीडियात राऊतांवरल टीकेची झोड उठली होती. तसेच मराठीतील 'ठाकरे' चित्रपटाला बाळासाहेबांच्या भूमिकेला 2-3 आवाज न जुळल्याने त्यावरही प्रेक्षक नाराज होते.

अखेर या सर्व अडथळ्यानंतर आज 'ठाकरे' प्रदर्शित होतोय. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूम्का केली आहे, तर अभिनेत्री अमृता राव मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित होणार असून याला मिळणारा प्रतिसाद लक्षणीय असेल.  

संबंधित बातम्या

Saam TV Live