महाराष्ट्रात ठाकरे सरकार चक्रव्युहात? पवार-उद्धव भेटीत नक्की काय झालं ? वाचा सविस्तर

साम टीव्ही
मंगळवार, 26 मे 2020
  • महाराष्ट्रात ठाकरे सरकार चक्रव्युहात ?
  • राज्यात राजकीय घडामोडींना वेग
  • पवार-उद्धव भेटीत नक्की काय झालं ?

राज्यातलं ठाकरे सरकार चक्रव्युहात सापडलंय. राज्यावर कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आलाय.

एकीकडे कोरोनाच्या संकटानं राज्य घेरलं गेलेलं असताना दुसरीकडे राज्यात राजकीय पटलावर घडामोडींना वेग आलाय याला निमित्त ठरलीय ती राज्याचं सत्तास्थान असलेल्या ठाकरेंच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी झालेली एक गुप्त बैठक! सोमवारी संध्याकाळी महाविकासआघाडी सरकारचे कर्तेधर्ते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत या तिघांमध्येच ही गुप्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्यात चर्चांना उधाण आलंय.

सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय. राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी थेट मातोश्री गाठली. तत्पूर्वी काही तास आधीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली. कोरोना संकट हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरलं असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपाकडून वारंवार केला जातोय. 

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. राज्यात सुमारे 55 हजार रुग्ण आहेत. एकट्या मुंबईत 30 हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींनाही वेग आलाय. राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळातही शरद पवारांनी बैठकीसाठी मातोश्रीवर जाणं टाळलं होतं. पण सोमवारी अचानक घडणाऱ्या या घडामोडींमुळे राज्यात नेमकं चाललंय काय? याचं कवित्व रंगायला सुरुवात झालीय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live