मुंबईत 1 कोटीचं घर घ्या, 30 लाखांत, ठाकरे सरकारनं आखला मोठा प्लान

साम टीव्ही
मंगळवार, 28 जुलै 2020

 

  • मुंबईत 1 कोटीचं घर घ्या, 30 लाखांत
  • ठाकरे सरकारनं आखला मोठा प्लान
  • मुंबईत मिळणार अवघ्या 30 लाखात घरं

आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी.. आता मुंबईत मोक्याच्या ठिकाणी तुम्हाला हक्काचं. तुमच्या मालकीचं घर मिळणार आहे.. आणि तेही अगदी 30 लाखात.

स्वत:च्या हक्काचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठा प्लान ठाकरे सरकारनं आणलाय. 1 कोटी किंमत असणाऱी घरं ठाकरे सरकार अवघ्या 30 लाखात सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करणार आहे. मुंबईच्या गोरेगावमध्ये अवघ्या 30 लाखात घर खरेदी करता येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही योजना तयार करण्यात आलीय.

मुंबईत सुरू होणारा हा गृहनिर्माण प्रकल्प सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा नागरिकांसाठी असणार आहेत. 

  • मुंबईच्या गोरेगावमध्ये 15 हजार घरं उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.
  • यामध्ये 300 स्क्वेअर फिट घराची जागा असणार आहे.
  • तुमच्या नावावर पक्कं घर नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहात
  • 3-6 लाखांमध्ये तुमचं उत्पन्न असेल तर पंतप्रधान योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळणार आहे.
  • 50-50 टक्के अशी सार्वजनिक-खाजगी भागीदारी या गृहनिर्माण प्रकल्पासाठी होऊ शकते. या गृहनिर्माण योजनचं भूमिपूजन हे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होऊ शकतं. एकीकडे मुंबईत जागांचे भाव कोट्यवधींच्या पार गेलेले असताना अवघ्या 30 लाखात मुंबईत सामान्य माणसाला हक्काचं घर मिळणार आहे.
     


संबंधित बातम्या

Saam TV Live