VIDEO | PMC बँक खातेधारकांना ठाकरे सरकारचा दिलासा

सिध्दी सोनटक्के
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक PMC bank घोटाळ्यामुळे अनेक सामान्य खातेधारकांचे कष्टाचे पैसे अडकले असताना नव्या सरकारकडून काही चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. पीएमसी बँकेच्या विलीनीकरणासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. खातेदारांच्या भल्यासाठी या बँकेचं विलीनीकरण आता राज्य सहकारी बँकेत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थात हा निर्णय केवळ राज्य सरकारचा नसेल. यासाठी रिझर्व बँकेची परवानगी लागेल.

पीएमसी बँकेच्या खात्यावरून जर तुम्ही एसआयपी किंवा म्यूच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर त्यावर परिणाम होईल. कोणत्याही गुंतवणूकीसाठी तुम्हाला दुसरं खातं लिंक करावं लागेल. असं नाही झालं तर रिझर्व्ह बँक बंदी हटवेपर्यंत तुम्हाला म्युच्यूअल फंडाचा लाभ घेता येणार नाही. बँक दिवाळखोरीत निघाली तरी तुमचे पैसे बुडणार नाहीत. अशा स्थितीत खातेधारकांच्या खात्यावर असलेल्या विम्याच्या माध्यामातून एक लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळेल. एकूण बचित जास्त असेल तर त्यापैकी काही भाग मिळू शकतो. रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असून त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल. सध्या रिझर्व्ह बँकेनं बँक कर्मचाऱ्यांना वेतन, दैनिक खर्च, व्याज इत्यादी देण्यास परवानगी दिली आहे.

webtittle: Thackeray Govt releases PMC account holders

संबंधित बातम्या

Saam TV Live