ठाकरेंची गुगली, काँग्रेस-NCPसह भाजप क्लीन बोल्ड, उद्धव ठाकरेंचा तुकाराम मुंढेंना उघड पाठिंबा

साम टीव्ही
रविवार, 26 जुलै 2020
  • उद्धव ठाकरेंचा तुकाराम मुंढेंना उघड पाठिंबा
  • डॅशिंग तुकाराम मुंढेंच्या पाठिशी उद्धव ठाकरे
  • ठाकरेंची गुगली, काँग्रेस-NCPसह भाजप क्लीन बोल्ड

कोरोना काळातच नागपुरात मुंढे विरुद्ध महापालिका असा संघर्ष रंगलाय. या सगळ्या वातावरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढेना उघड पाठिंबा दिलाय. बघुयात तुकाराम मुंढेंबद्दल उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, वाचा..

डॅशिंग तुकाराम मुंढे. सध्या चर्चेत आहेत ते नागपुरातल्या वादग्रस्त निर्णयांसाठी कोरोना काळात तर शिस्तप्रिय मुंढेंमुळे तुकाराम मुंढे विरुद्ध पालिका असा संघर्ष निर्माण झालाय. अशात आता स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंढेंना उघड पाठिंबा दिलाय. 

कोरोना काळात मुंढेंबाबत अनेक तक्रारी आल्यात.  एकतर्फी निर्णय घेणं, फोन न उचलणं, भेटायला गेल्यावर बाहेर उभं ठेवणं अशा तक्रारींचा पाढा नागपुरात वाचला गेलाय. खुद्ध नितीन गडकरी यांनी सुद्धा मुंढेंविरोधात तक्रार केलेय. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मुंढेंच्या पाठीशी उभे राहिलेत. तेही अगदी उघड अघड

ठाकरेंनी मुंढेंना दिलेला फ्री हँड अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्यांना या कठीण काळात यामुळे धीर मिळेल.. तर मुख्यमंत्र्यांची कोंडी करु पाहणारे विरोधक आणि सत्तेतले सहकारी सुद्धा या पाठिंब्यामुळे भुवया उंचावून पाहत राहतील.


संबंधित बातम्या

Saam TV Live