तीन सफाई कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 मे 2019

ठाणे : ठाण्यातील प्राईड प्रेसिंडेन्सी लक्झेरिया, ढोकाळी नाका, ढोकाळी, ठाणे (प.) येथे गुरुवारी (ता. 9) मध्यरात्रीच्या सुमारास 8 कामगार एसटीपी प्लांटच्या सफाईचे काम करत असताना गुदमरले. या दुर्घटनेत 3 कामगारांचा दुर्देवी मृत्यु झाला. सदर एसटीपी प्लांट हा एकूण 130 घनमीटरचा आहे. या घटनेची माहिती मिळताचा घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन अधिकारी, पोलिस अधिकारी आदींच्या पथकाने 5 कामगारांना सुखरुप बाहेर काढून पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.

अमित पुहाल (वय 20), अमन बादल (वय 21), अजय बुमबक (वय 24) अशी मृतांची नावे असून मृतदेह पोलिस कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत जखमींची प्रकृती ही स्थीर आहे. वरील सर्व व्यक्ती मुळचे हरयाणा राज्यातील असुन सफाई ठेकेदार अजय बागुल याच्याकडे सद्यस्थितीत ते कामा निमित्ताने भाईंदर (प.) येथे राहत होते.

Web Title: 3 labors dies suffocating in Deforestation tank

संबंधित बातम्या

Saam TV Live