अमृता फडणवीसांना सेनेचा पहिला दणका; Axis ची खाती वळवली

Uddhav Thackeary, Amruta Fadnavis
Uddhav Thackeary, Amruta Fadnavis

ठाणे, शिवसेनाचा बालेकिल्ला. शिवसेना पक्षप्रमुखांनी घेतलेला कोणताही निर्णय म्हणजे ठाण्यातील शिवसैनिकांसाठी पडत्या फळाची आज्ञा. याचीच प्रचीती आता येताना पाहायला मिळतेय. गेले काही दिवस आपण अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना वाद टोकाला गेलेला पाहतोय. दोघांमधील ट्विटर वाॅर देखील आपण पाहिलं. 

या नंतर आज ठाण्यातून मोठी बातमी समोर येताना पाहायला मिळतेय. ठाणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतलाय. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे बँक खाती एक्सिस बँकेतून इतर बँकांमध्ये वळवण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे महानगर पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांची बँक खाती इतर बँकांमध्ये हलवण्यात आल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलंय. 

ठाणे महापौर नरेश म्हस्के यांनी आजच हा निर्णय घेतलाय. याबाबत नरेश म्हस्के यांनी अनेक खाते धारकांशी चर्चा केली आणि ताबडतोब हा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय.  

सध्या एक्सिस बँकेत ठाणे महानगर पालिकेत काम करणाऱ्या अनेकांची खाती आहेत. या बँकेत कर किंवा पगाराच्या माध्यमातून अनेक पैशांची उलाढाल होत असते. त्यामुळे ठाणे महानगर पालिकेने घेतलेला हा निर्णय एक्सिस बँकेसाठी अत्यंत मोठा मनाला जातोय 

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक दणका देणार आहेत. राज्यातील पोलिसांच्या पगाराची ऍक्‍सिस बॅंकेतील खाती रद्द करून ती राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे सोपवली जाणार आहेत. त्यामुळे खासगी क्षेत्रातील या बॅंकेला वापरावयास मिळणारा तब्बल 11 हजार कोटींचा निधी बंद होणार आहेत. 

WebTitle : amruta fadanavis shivsena and axix bank issue TMC to shift employees salary accounts to other banks

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com