(VIDEO) आधी रस्ते नीट करा.. नंतरच मतं मागा..   

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

ठाणेकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यामातून हाती घेतलीये ही मोहीम...  

ठाणेकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन एक मोहीम हाती घेतलीय. ती म्हणजे जो पर्यंत वाहतूककोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांपासून ठाणेकरांना मुक्ती मिळणार नाही तोपर्यंत येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला आणि उमेदवाराला मतदान करणार नसल्याचा पवित्रा ठाणेकरांनी घेतलाय.

'रोड कम्युटर फोरम' हे फेसबुक पेज तयार करुन फेसबुकच्या माध्यमातुन हॅश टॅग "नो रोड नो वोट" म्हणजेच ठाणे शहरातील वाहतुक कोंडीतून सुटका आणि खड्डेमुक्त ठाणे शहर होत नाहीत तोपर्यंत येणाऱ्या निवडणुकीत आम्ही कोणीही मतदान करणार नाही हा संदेश देण्यात आलाय.

इतकंच नाही तर एक विशेष मोहिमही राबवण्यात येतेय. गाडीच्या लाईट्स ब्लिंक करत टोल आणि खड्ड्यांना विरोध करण्यात येतोय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live