(VIDEO) ठाण्यात सिद्धेश्वर तलाव परिसरात फुटली पाण्याच्या टाकीची पाईपलाईन; लाखो लिटर पाणी वाया 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरातील पाण्याच्या टाकीची पाईपलाईन काल ( मंगळवारी ) रात्री 10 च्या सुमारास अचानक फुटली. यामुळे तब्बल लाखो लिटर पाण्याची नासाडी तर झालीच शिवाय परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मालमत्तेचंदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

गेल्याच महिन्यात याच टाकीची पाईपलाईन फुटली होती, तेव्हाही अशीच परिस्थिती उद्भवली होती. मात्र पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. सिद्धेश्वर तलाव परिसरात लाखो लिटरच्या एकूण 3 टाक्या आहेत.  

या टाक्या 20 वर्ष जुन्या आहेत. मात्र या टाक्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे स्थनिकांचे म्हणणे आहे.  

WebTitle : marathi news thane pipeline of water tank burst  huge water waste 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live