मुंबई, ठाण्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या हाकेमुळे रुग्णांचे हाल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

आपल्या विविध मागण्यांसाठी आज राज्य कर्मचारी संघटनांच्या वतीने संपाचं हत्यार उपसण्यात आलंय. सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आज ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांनी निदर्शन करून सरकारचा निषेध केला.

आजच्या या संपाच्या हाकेमुळे रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. जिल्ल्हाधिकरी कार्यालयाच्या समोर देखील कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केलीत. सरकारनं याकडे लक्ष देण्याची मागणी केलीय.

दरम्यान, राज्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जे जे रुग्णालयात रुटीन ऑपरेशन ठप्प झालंय. जेजेमध्ये अत्यावश्यक ऑपरेशन्सच सुरु आहेत. रुग्णालयाच्या सर्व परिचारीका, सफाई कामगार, टेक्निशीयन, वॉर्ड बॉय मात्र संपावर गेलेत. रुग्णालयाने बाहेरुन 120 प्रशिक्षीत परिचारीका, 200 इंटर्न शिकावू डॉक्टर्स, 34 सफाई बोलावलेत. त्याचबरोबर 68 सेक्युरीटी गार्ड्सही कामाला लावण्यात आलेत.

WebLink : marathi news  thane state government employees strike thane condition

संबंधित बातम्या

Saam TV Live