पूर्वसूचना न देताच 'केबल बंद'

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

ठाणे - आपल्या आवडीच्या दूरचित्रवाणीवाहिन्या निवडण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत मुदत दिली असली, तरी या वाहिन्यांची यादी केबलचालकांकडे न दिल्याने ६ फेब्रुवारीपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील शेकडो घरांमध्ये सशुल्क दूरचित्रवाणी वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद झाले आहे. पूर्वसूचना न देताच ही  सेवा बंद केल्यामुळे ग्राहक संभ्रमात पडले आहेत.

पसंतीच्या दूरचित्रवाणीवाहिन्या निवडण्यासाठी ‘ट्राय’ने सुरुवातीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतीत पसंतीच्या वाहिन्यांची यादी ग्राहकांनी केबलचालकांकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अनेक केबलचालकांनी ग्राहकांकडून त्यासाठीचे अर्ज भरून घेण्यासही सुरुवात केली होती. मात्र, अनेक केबलचालकांचा असहकार, वाहिन्यांची निवड कशी करायची, याबाबत ग्राहकांमध्ये असलेली संभ्रमावस्था; तसेच वाहिन्यांच्या प्रक्षेपण दरासंदर्भातील वाद या पार्श्‍वभूमीवर ट्रायने वाहिन्या निवडण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली.

मात्र, मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील शेकडो घरांत ६ फेब्रुवारीपासून सशुल्क दूरचित्रवाणी वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करण्यात आले. केबलचे पैसे न भरल्याने सेवा बंद करण्यात आल्याच्या समजातून ग्राहकांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. पैसे घेऊन केबलचालकांच्या कार्यालयात गेल्यानंतर, ‘पसंतीच्या वाहिन्यांची यादी निवडून ती यादी आमच्याकडे जमा करा, नंतरच सेवा सुरू होईल, असे उत्तर त्यांना मिळाले. मात्र, अडूनही वाहिन्यांची निवड कशी करावी, त्याचे शुल्क किती असेल, याबाबत अनेक ग्राहकांमध्ये गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती घेण्यासाठी केबलचालकांच्या कार्यालयांतील दूरध्वनी दिवसभर खणखणत आहेत; मात्र केबलचालकांकडूनही योग्य माहिती मिळत नसल्याचा ग्राहकांचा आक्षेप आहे.

Web Title: Undeclared cable band in mumbai thane navi mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live