(Video) फक्त 180 सेकंदात पकडला चोर; नागपूर रेल्वे पोलिसांचा सतर्कपणा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

सीसीटीव्हीच्या सहाय्यानं अवघ्या १८० सेकंदात नागपूर रेल्वे स्टेशनवर एका चोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात. अवघ्या १८० सेंकदात चोराच्या मुसक्या कशा आवळल्या असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. जी दृष्य तुम्ही पाहताय ती आहेत नागपूर रेल्वे स्टेशनवरच्या वेटींग रुमची. वेटींग रुममध्ये काही प्रवासी झोपलेले दिसत आहेत. त्यापैकी एका प्रवाशाचा मोबाईल शब्बीर शेख नावाच्या भुरट्या चोरानं लंपास केला.

आपल्याला कुणी पाहिलं नाही या भ्रमात हा चोर तिथनं निघूनही गेला. मात्र स्टेशनवरच्या कंट्रोल रुममधल्या सीसीटीव्हीत ही चोरी कैद होत होती. या चोराच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांची नजर गेली आणि क्षणाचाही अवधी न लावता कंट्रोल रुममधले पोलिस स्वत:च या चोराच्या मागावर धावले. हा चोर चोरी करतो तेव्हा सीसीटीव्हीमधल्या दृश्यांमध्ये ६ वाजून ३ मिनिटं आणि ४५ सेकंद दिसत आहेत. त्याचवेळी कंट्रोल रुममधल्या पोलिसाचं या चोरीकडे लक्ष जातं आणि तो तात्काळ सहकाऱ्याला सतर्क करतो. अगदी पुढच्या मिनिटाला म्हणजे ६ वाजून ४ मिनिटांनी स्टेशनवरनं पोलिस धावाधाव करताना दिसत आहेत. तोवर हा चोर स्टेशनबाहेर पोहचलेला दिसत आहे.

तोवर या चोराच्या मागावर असलेले पोलिसही स्टेशनबाहेर पोहचलेले दिसतात. कंट्रोल रुमकडून हाच चोर असल्याचं निश्चित करताना एक पोलिस दिसतो. आणि बरोबर ६ वाजून ६ मिनिट आणि ५ सेकंदांनी पोलिस या चोराच्या मुसक्या आवळताना दिसतात. 
सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या ३ मिनिटात पोलिसांनी या चोराच्या मुसक्या आवळल्यात. नागपूर पोलिसांच्या सतर्कतेचं कौतुक होतंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live