लालबागच्या राजाच्या दरबारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट; चोरट्यांनी 135 मोबाईल लांबवले

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलीय. अनेक जण तासन तास रांगा लावून बाप्पाचं दर्शन घेतायंत. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करतायंत. आतापर्यंत चोरट्यांनी गणेश भक्तांचं 135 मोबाईल लंपास केले आहेत.

गणेशोत्सवात लालबाग परिसरात मोठी गर्दी होते. त्यामुळं  सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावले .मात्र, तरीही भुरटे चोर गर्दीचा फायदा घेऊन मौल्यवान वस्तू चोरत आहेत.

यामागे चोरांच्या मोठ्या टोळ्यांचा हात असल्याची शक्यता आहे. त्यामुळं बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आता या चोरांना गजाआड  करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live