(video) - टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने चोरट्यांचे कार घेवून पलायन 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

पुण्यातून टेस्ट ड्राइव्हच्या नावाखाली एक कार घेऊन चोरटे पसार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. लोणी काळभोर हद्दीमधून सुझूकी कंपनीची एस क्रॉस ही नविन चारचाकी गाडी दोघाजणांनी  बनावट सिम कार्डच्या आधारे बोलावून घेतली. या गाडीतील कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून, त्यांना जबर मारहाण करून या दोघांनी ही गाडी घेऊन पळ काढला.

घटना 7 ऑक्टोबरची आहे. दरम्यान ही चोरीची गाडी नातेपुतेच्या दिशेने येत असल्याचं फलटण पोलिसांना कडून नातेपुते पोलीस प्रशासनास समजलं.

त्यानुसार सापळा रचूनपोलिसांनी ही कार थांबवून यातील आरोपी विकास साहेबराव वाघमारे, प्रवीण लक्ष्मण हिप्परकर या दोघांना जेरबंद केलंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live