मुंबईमध्ये 15 मेपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता...

 मुंबईमध्ये 15 मेपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता...

मुंबईमध्ये ३० एप्रिलपर्यंत ४२ हजार तर १५ मेपर्यंत ३ लाख कोरोना रुग्णांचा आकडा जाण्याची शक्यता असल्याचं मत केंद्रीय पथकाने व्यक्त केलं होतं. मात्र मुंबई महापालिकेने ही माहिती बिनबुडाची असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे ही आकडेवारी लोकांची दिशाभूल करण्यासारखी असल्याचं नमूद करण्यात आलंय. बीएमसीने या माहितीला नकार देत मुंबईत अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय पथकाच्या मुंबईतील पाहणी दौऱ्यानंतर शहरात कोरोना रुग्णांची संख्या लाखोंवर जाणार असल्याच्या अंदाजाने एकच घबराट पसरली होती. यावर मुंबई महापालिकेने लेखी स्पष्टीकरण दिले आहे. ((त्यांनी त्यात नमूद केले आहे की, केंद्रीय पथकाने आपल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान पालिका आयुक्तांसह पालिकेतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. तसेच पालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. या पथकाने पालिका प्रशासनाद्वारे राबवण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक आणि वैद्यकीय उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केलेले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मुंबई-पुण्यासह राज्यभरातल्या नागरिकांची झोप उडालीय. त्यातच आता मुंबईकरांना धडकी भरवणारी आकडेवारी समोर आलीय. ३० एप्रिल पर्यंत ४२ हजार जणांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे, तर १५ मे पर्यंत तब्बल साडे सहा लाख मुंबईकर कोरोनाचे शिकार होण्याचा अंदाज आहे. केंद्रीय आरोग्य पथकानं ही धक्कादायक आकडेवारी जाहीर केल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्रानं केलाय. पाच सदस्यांच्या केंद्रीय पथकानं मुंबईतल्या कोरोनाबाधित ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर सांख्यिकी मॉडेलच्या आधारे या पथकानं मुंबईतल्या कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत हा अंदाज वर्तवलाय.
 जर या गतीनं कोरोनाबाधितांची संख्या वाढली तर ३० एप्रिलपर्यंत मुंबईला ३० हजार ४८१ ऑक्सिजनशिवाय आयसोलेशन बेड, १२०० आयसीयू आणि ३९२ व्हेन्टिलेटर्सची गरज भासणार आहे. तर , १५ मे पर्यंत मुंबईत १३ हजार ६३६ व्हेन्टिलेटर्स, ४ लाख ८३ हजार ३८५ ऑक्सिजनशिवाय आयसोलेशन बेड, आणि २७ हजार ६८८ आयसीयू कमी पडू शकतात, असं निरीक्षण या पथकानं दिलेल्या अहवाल नोंदवण्यात आलंय. 
धारावी, वरळी, महालक्ष्मी, माटुंगा, सायन, परळ, अंधेरी पश्चिम, गोवंडी, मानखुर्द, नागपाडा आणि भायखळा हे कोरोनाचे हॉटस्पॉट असतील, असंही केंद्रीय पथकानं आपल्या अहवालात म्हटलंय.  
या भागातला कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सुमारे ८ हजार ४३४ स्वयंसेवकांची गरज भासेल, असंही या अहवालात म्हटलंय. 
एकूणच, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई सील करण्यासह अनेक पर्यायांचा विचार केला जातोय. शिवाय जास्तीत जास्त कोरोना चाचण्यांचाही सल्ला देण्यात आलाय

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com